*कन्हान येथे विश्व एड्स दिवस निमित्य नागरिकांना निरोध वाटुन केली जनजागृति*
मानवाधिकार संरक्षण संघटन द्वारे आयोजन
कन्हान – कन्हान येथे विश्व एड्स दिवस निमित्य मानवाधिकार संरक्षण संघटन द्वारे जनजागृति अभियानाचे आयोजन करण्यात आले असुन नागरिकांन मध्ये जनजागृति करुन व नागरिकांना निरोध वाटप करुन विश्व एड्स दिवस साजरा करण्यात आला .

विश्व एड्स दिवस १९८८ पासून दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जात असुन एचआयव्ही संसर्गाच्या प्रसारामुळे झालेल्या एड्सच्या साथीच्या आजाराविषयी जागरुकता वाढवणे आणि या आजाराने मरण पावलेल्या लोकांसाठी शोक व्यक्त करणे हा असुन सरकारी आणि आरोग्य अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि जगभरातील लोक एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासोबत हा दिवस पाळतात. एड्सचे पूर्ण नाव ‘अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम’ आहे आणि हा एक प्रकारचा विषाणू आहे, ज्याचे नाव एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) आहे . गुरुवार दिनांक १ डिसेंबर ला विश्व एड्स दिवस निमित्य कन्हान येथे मानवाधिकार संरक्षण संघटन द्वारे जनजागृति अभियानाचे आयोजन करण्यात आले असुन नागरिकांन मध्ये जनजागृति करुन व नागरिकांना निरोध वाटप करुन विश्व एड्स दिवस साजरा करण्यात आला .
या प्रसंगी पंकज रामटेके, चेता फुले, अश्विन उमराय, मनोज मेश्राम, हेमंत बांगरे, अश्विन हेलवकर, हरिदास तिरोडे, विजय दुर्गा, राहुल चकोले सह आदि नागरिक उपस्थित होते .




