Home नागपुर हिराबाई शाळेत सावित्री बाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी 

हिराबाई शाळेत सावित्री बाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी 

9

हिराबाई शाळेत सावित्री बाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी 

कन्हान, ता.०३

    हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे विविध स्पर्धा आयोजित करुन सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात पार पडली.

   सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्य बुधवार (दि.३) जानेवारी हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

   कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शाळेचे संचालक नरेंद्र वाघमारे यांचा हस्ते सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी रांगोळी स्पर्धा, निबंधों स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करुन विद्यार्थ्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात नरेंद्र वाघमारे, मुख्याध्यापिका आयाशा अन्सारी यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

      शेवटी शिक्षकांनी आणि विद्यार्थांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका आयाशा अन्सारी यांनी केले तर आभार प्रदर्शन नेहा गायधने यांनी केले .प्रसंगी गणेश रामापुरे, भास्कर सातपुते, गीता वंजारी, अभिषेक मोहनकर, किर्ती वैरागडे, मंदाकिनी रंगारी, जयश्री पवार, रुपेंद्र सेंगर आणि कर्मचारी वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.