Home Breaking News कन्हान ला लहान मुलांनी दही हंडी उत्सव साजरा केला 

कन्हान ला लहान मुलांनी दही हंडी उत्सव साजरा केला 

8

कन्हान ला लहान मुलांनी दही हंडी उत्सव साजरा केला 

 


कन्हान : – शहरात व परिसरात दही हंडी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असुन गेल्या दोन वर्षा पासुन राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने दहीहंडी फोडण्यावर बंदी असुन शहरात कोरोना प्रादुर्भाव नसल्याने स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे छोटया मुलांनी गोपाल अष्टमी निमित्य दहीहंडी फोडुन उत्सव साजरा केला.

        कन्हान शहरात मागील कित्येक तरी वर्षापासुन दही हंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व शहरात गेल्या दोन वर्षा पासुन कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने दही हंडी महोत्सवावर बंदी घातली आहे. या वर्षी शहरात कोरोना प्रादुर्भाव नसल्याने स्वामी विवे कानंद नगर कन्हान येथे लहान छोटया मुलांनी गोपाल अष्टमी निमित्य दहीहंडी फोडुन उत्सव थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रदीप बावने, लहान मुले सुप्रित बावने, इश्प्रीत बावने, वेदांत ऊके, सिद्ध बुंदेलिया, आरुशी बुंदेलिया, समर पनिकर, अक्षिदा पनिकर आदी छोटया मुलानी दहीहंडी उत्सव  थाटात साजरा केला.