Home चंद्रपूर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पी एम श्री.जी.प.उच्च प्राथमिक...

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पी एम श्री.जी.प.उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथील सहा विद्यार्थ्यांना सुयश

10

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा

पी एम श्री.जी.प.उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथील सहा विद्यार्थ्यांना सुयश

वरोरा
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत पीएमश्री.जी.प.उच्च प्राथमिक शाळा , आनंदवन येथील सहा विद्यार्थी परीक्षेसाठी प्रवेशित झाले होते.सर्व विद्यार्थी यशस्वी झाले आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा वर्ग आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी असून सदर परीक्षा केंद्र सरकार पुरस्कृत शिष्यवृत्ती परीक्षा आहे.ही परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद द्वारे घेतली जाते.या परीक्षेत मानसिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन भाग असतात.या परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षण ९ ते १२ वी.पर्यंत ठेवण्यासाठी आर्थिक मदत करते.यामध्ये समर राऊत,कनक रौतेल ,सानिया अहिरकर,कार्तिक मेश्राम,अमृता गोरवे व प्रतीक लांडगे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.शाळेचे मुख्याध्यापक नगाजी साळवे यांचे मार्गदर्शनात शिक्षक संदेश चिकाटे,विजय बांदुरकर,विलास मुरस्कर यांनी अथक परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महारोगी सेवा समिती,आनंदवन चे विश्वस्त सुधाकर कडू,शाळा व्य.समितीचे अध्यक्ष बोथले,सदस्य हेमने,मेश्राम,ठाकरे,शेंडे, शास्त्रकार आदी सदस्य व सर्व शाळेच्या शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.