सावधान, बिबट्याने मुक्काम ठोकला कांन्द्रीत
कांद्रीत बिबट आढळुन आल्याने परीसरात खळबळ
कन्हान, ता.०५
वेकोलि कामठी खुली कोळसा खदान कांद्री वार्ड क्र. २ च्या लोकवस्ती जवळील नाल्यालगत ओबी माती डम्पींग केली आहे. याच नाल्याजवळ सकाळच्या सुमारास मादी बिबट आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. नागरिका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभाग व पोलीस विभागाला पाचारण करण्यात आले होते.

मंगळवार ( दि.४) मे ला सकाळच्या सुमारास नागरिकांना मादी बिबट आढळुन आल्याची माहिती कांद्री गावात वा-या सारखी पसरताच नागरिकांनी बिबट ला पाहण्याकरिता नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.





