वराडा शिवारात दोन युवकांना मारहाण केल्याप्रकरणी कन्हान पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपूर येथील दामीश रशीद खान (वय-१८) हे सकाळी ९ च्या सुमारास वाळू साठ्यावर कामावर गेले होते. त्याच्यासोबत प्रशांत आणि अविकाश हे दोघ होते. दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास राजू धरोड, शिव हाटे, प्रज्ज्वल हरणे आणि इतर तिघांनी अविकाश आणि दामीश याला मारहाण करू लागले. दोघांनाही मारहाण केल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे ते पळून गेले. यात दामीश हा जखमी झाला. त्याला कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कन्हान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास कन्हानचे पोलिस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.