Home Breaking News नगरपरिषद कन्हान ला ब्रॉंड अँब्येसेडर ची नियुक्ती

नगरपरिषद कन्हान ला ब्रॉंड अँब्येसेडर ची नियुक्ती

10

नगरपरिषद कन्हान ला ब्रॉंड अँब्येसेडर ची नियुक्ती

कन्हान : – स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वंसुधरा अभि यान २० अंतर्गत शासनाने निर्देशित केल्याने कन्हान- पिपरी शहरात प्रत्येक वार्डाकरिता ब्राॅंन्ड अँब्येसेडर तसेच पर्यावरण दुत नेमण्यात आलेले आहे. सर्व नियुक्ती ब्राॅंड अँब्येसेडर तसेच पर्यावरण दुत यांना नगरपरिषद प्रशासनने दिलेल्या आदेशांचे पालन करायचे आहे. जेणे करून कन्हान शहर व परिसर स्वच्छ होईल व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वंसुधरा अभियान २० मध्ये शहराला बक्षीस प्राप्त होऊ शकेल. सर्व ब्राॅंड अंब्येसेडर यांची नियुक्ती नप मुख्याधिकारी संदिप बोरकर, नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर व नोडल अधिकारी संकेत तालेवार यांच्या त्रीस्तरीय समिति ने केली आहे.

यात वार्ड क्रमांक १) शेखर वैरागडे, २) समशेर पुरवले, ३) मनोज बैटवार ४) शैलेश दिवे, ५) भारत पगारे, ६) देवा चतुर, ७) हरिष तिडके, ८) उमेश पौनिकर यांची नियुक्ति करण्यात आली आहे.