Home चंद्रपूर प्रा. डॉ. गोपाल वरुटकर यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती

प्रा. डॉ. गोपाल वरुटकर यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती

9

प्रा. डॉ. गोपाल वरुटकर यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती

वरोरा-

आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे कार्यरत असलेले प्रा. डॉ. गोपाल वरुटकर यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकवर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रा. डॉ. गोपाल वरुटकर हे याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असून ते अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थीकेंद्रित, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनातील अनुभव आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीत वेळोवेळी मोलाचा वाटा उचलला आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, संशोधन कार्य आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमांत त्यांचा सतत सक्रिय सहभाग राहिला आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात अधिक गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, सहकारी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.