Home विदर्भ गडचिरोली सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा; नवजात बालकांना दूध पावडरची भेट

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा; नवजात बालकांना दूध पावडरची भेट

47

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा; नवजात बालकांना दूध पावडरची भेट
गडचिरोली | प्रतिनिधी
सौ. ग्रीष्मा विवेक मून (अध्यक्ष, जिल्हा महिला तक्रार निवारण समिती तथा सामाजिक कार्यकर्त्या, गडचिरोली) यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष दत्तक संस्था, गडचिरोली येथे सामाजिक जाणीव जपणारा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.
वाढदिवसाचे औचित्य साधत मून परिवाराने संस्थेतील नवजात बालकांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांना आवश्यक असलेले Lactogen Pro 1 हे दूध पावडर भेट स्वरूपात दिले. सध्या संस्थेमध्ये एक ते दीड महिन्यांची नवजात बालके असून, त्यांच्या संगोपनासाठी लागणाऱ्या या दूध पावडरचा किमान एक महिन्याचा साठा मून परिवाराने उपलब्ध करून दिला.
विशेष दत्तक संस्था ही ० ते ६ वर्षे वयोगटातील अनाथ, सापडलेली, टाकून दिलेली किंवा समर्पित बालके यांच्यासाठी कार्यरत असते. अशा बालकांचे संगोपन, आरोग्य, शिक्षण व सर्वांगीण विकासाची जबाबदारी संस्था पार पाडते. तसेच या बालकांना शासनाच्या व कायदेशीर प्रक्रियेनुसार पात्र दांपत्यांना दत्तक देण्यात येते. त्यामुळे या संस्थांचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील मानले जाते.
गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या मून दांपत्याने वाढदिवसासारखा आनंदाचा क्षणही समाजसेवेसाठी अर्पण करत एक आदर्श निर्माण केला आहे. नागपूरहून गडचिरोली येथे दूध पावडर पाठविण्यास सहकार्य करणारे श्री. राहुल भाऊ जवादे यांचेही यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमाच्या प्रसंगी मा. वर्षा मनवर मॅडम (अध्यक्ष, बाल कल्याण समिती, गडचिरोली), मा. श्री. दिनेश बोरकुटे, मा. श्री. काशिनाथ देवगडे (सदस्य, बाल कल्याण समिती), मा. श्री. नशीब जांभूळकर (अधीक्षक, विशेष दत्तक संस्था), श्री. विवेक विरदास मून (सामाजिक कार्यकर्ते), चि. विकल्प विवेक मून, चि. संकल्प विवेक मून तसेच कु. डिंपल सहारे (परिचर्या अधिकारी) व संस्थेतील कर्मचारीवृंद प्रामुख्याने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे संस्थेतील बालकांच्या संगोपनास मोठी मदत मिळाली असून, उपस्थितांनी मून परिवाराच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
“वाढदिवस साजरा करण्याचा हा सामाजिक आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सत्कार्य सदा घडो! 🙏