Home चंद्रपूर नव्याने नियुक्त झालेले ठाणेदार साहेब यांचेसमोर अवैध धंद्यांना आळा घालण्याचे आवाहन ...

नव्याने नियुक्त झालेले ठाणेदार साहेब यांचेसमोर अवैध धंद्यांना आळा घालण्याचे आवाहन वरोऱ्यात खुलेआम सट्टा बाजार सुरू

11

नव्याने नियुक्त झालेले ठाणेदार साहेब यांचेसमोर अवैध धंद्यांना आळा घालण्याचे आवाहन

वरोऱ्यात खुलेआम सट्टा बाजार सुरू

यापूर्वी वरोरा ठाण्यात आलेले ठाणेदार अवैध धंद्यांना आळा घालण्यास ठरले निष्फळ

वरोरा
नागपूर – चंद्रपूर राज्यमहामार्ग लगत वरोरा शहर असून शांतप्रिय शहर म्हणून शहराची ओळख आहे.याठिकाणी सर्व धर्माचे लोक एकमेकांशी प्रेमळ संवाद करून गुनगोविंदाने राहतात.परंतु शहरात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे शहर बदनामीच्या उंबरठ्यावर आहे.अवैध धंद्याच्या आहारी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाची वाताहत होत आहे.परंतु कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याची जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनावर आहे तेच पोलीस प्रशासन गप्प का?असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे.याचा अर्थ पाणी कुठ तरी मुरत आहे तेव्हाच अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांचे फावते आहे.असे म्हणणे वावगे ठरणार नाही.पोलीस ठाण्यामध्ये किती पोलीस निरीक्षक आले आले आणि किती बदलून गेले.परंतु अवैध धंद्यांना एकही पोलीस निरीक्षक कायमचा आळा घालू शकले नाही.ही एक शोकांतिका आहे.अवैध सट्टा बाजार शहरात चौकाचौकात,गल्ली बोळात सर्रासपणे सुरू असताना सुद्धा पोलीस प्रशासनाची कार्यवाही शून्य आहे.वरोरा ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के हे अवैध धंद्यांना लगाम लावतील का?अशी चर्चा सध्या वरोरा शहरात सुरू आहे.अवैध धंद्यांना आळा
घालण्याचे मोठे आवाहन त्यांचेसंमोर आहे.
वरोरा शहर हे थोर समाजसेवक ,जागतिक पटलावर नाव कोरलेले आहे अशा श्रद्धेय बाबा आमटे यांनी निर्माण केलेल्या आनंदवनामुळे प्रसिद्ध आहे.देशी विदेशी पर्यटक याठिकाणी येत असतात.तसेच नामवंत शैक्षणिक संस्था शिक्षणाचा वारसा वर्षानुवर्ष चालवीत आहे.या शहरातील आनंद निकेतन महाविद्यालय व लोकमान्य शाळा,महाविद्यालयातून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.विद्यार्थी घडविण्याकडे सर्वांचा कल असतो.परंतु चांगल्या दर्जाचे शिक्षण देणाऱ्या शहराला मात्र पूर्णतः अवैध धंद्यांनी वेढले आहे.
शहरात सट्टा बाजार चौकाचौकात ,गल्लीबोळात, पान ठेल्याचे आडून सर्रासपणे सुरू आहे.एका व्यक्तीचे शहरात सट्टा बाजाराचे सात पॉइंट असल्याची माहिती आहे.साई मंगल कार्यालय परिसर,आझाद वॉर्ड ,रेल्वे स्टेशन परिसर, माढेली नाका परिसर,आदी ठिकाणी सट्टा बाजार सुरू आहे.नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार साहेबांनी शहरातील अवैध सट्टा बाजाराला कायमचा अंकुश लावावा अशी मागणी जनता करीत आहे.