Home चंद्रपूर *राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरचा सामाजिक सुरक्षा जागरूकता कार्यक्रम*

*राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरचा सामाजिक सुरक्षा जागरूकता कार्यक्रम*

13

*राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरचा सामाजिक सुरक्षा जागरूकता कार्यक्रम*

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हा वीजनिर्मिती व वितरण प्रकल्प विविध सामाजिक उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची विशेष ओळख या उद्योगाने निर्माण केली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून उद्योगाच्या सुरक्षा विभाग, वीज विभाग व सीएसआर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम येरूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सामाजिक जागरूकता व वैयक्तिक सुरक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्लांट हेड देवेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सुरक्षा विभागाचे प्रफुल्ल वैद्य, वीज विभागाचे मनीष ठाकरे, सीएसआर विभाग प्रमुख डॉ. अनिष नायर, उपव्यवस्थापक प्रतीक वानखेडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मोरे मॅडम, शिक्षकवृंद, ग्राम समिती सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सामाजिक आरोग्य सुरक्षा, शरीराची सुरक्षा, संभाव्य धोके ओळखणे, तसेच घरी आणि शाळेत घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अग्निशामक यंत्रांचा वापर कसा करावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात आले.

धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्राम समिती सदस्य व शाळेच्या मुख्याध्यापकांनी उद्योगाचे आभार मानत त्यांच्या सामाजिक सुरक्षा जागरूकता मोहिमेचे कौतुक केले.