चिमूर तालुक्यात दिंव्याग समता सप्ताह साजरा
चिमूर, ता.०९
समग्र शिक्षा समवेशित शिक्षण पंचायत समिती चिमूर अंतर्गत ३ डीसेंबर ते ९ डिसेंबर ला जागतिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्याकरिता व शिक्षणात टिकुन ठेवण्या करीता पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, समाज, शेत्रीय यंत्रणा व सवंगडी यांच्या साह्याने जनजागृती करण्यात आली.

यावेळी गटशिक्षाधिकारी पंचायत समिती चिमूर रुपेश कामडी यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत समग्र शिक्षा समावेशित शिक्षण, गट साधन केंद्र , पंचायत समिती चिमूर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरखेडा यांचा संयुक्त विद्यमानाने दिंव्यागाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.





