* शिस्तबध्य “श्री” चे विसर्जन तिन दिवस शांतेत
* विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरींग दोरजे यांची भेट
* प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करीत बाप्पाला निरोप

कन्हान,ता.09 सप्टेंबर
नदी काठावरील पुरातन काली माता मंदीर कन्हान घाटावर नदीच्या पुर परिस्थितीच्या पाश्वभुमीवर नगरपरिषद, पोलीस स्टेशन व ढिवर समाज सेवा संघटना व्दारे शिस्तबध्य प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करित “श्री” च्या मुर्तीचे विसर्जन बुधवार, गुरुवार आणी शुक्रवार असे तिन दिवस कडक पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पाडले.

कन्हान नदी काठावरील काली माता मंदीर विसर्जन घाटावर नगरपरिषद कन्हान-पिपरी व्दारे प्रतिबंधक नियम पालन करण्याकरिता घाटावर कटघरे, विद्युत, स्वयंसेवक, माहीती व मदत कक्षासह व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली होती. तसेच नगर परिषदेच्या नवीन इमारतीचा पटगंणात कृत्रिम तलाव निर्माण करून घरगुती लहान गणेश मुर्तीचे विर्सजन करण्या करिता नगराध्यक्षा व उपाध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी लोकांना आपले घरगुती गणेश मुर्ती कृत्रिम तलावात विर्सजन करण्याचे आव्हान केले होते.






