गरजू कुटुंबांना घरकुल योजना देऊन न्याय द्या- आकाश महातो
उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन
कन्हान,ता.११
कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.६ पिपरी येथील गरजू कुटुंबांना घरकुल योजना देऊन न्याय द्या अशी मागणी युवा नेते आकाश महातो व शिष्टमंडळाने यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक वंदना सौरंगपते व कन्हान पिपरी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.६ पिपरी येथे अनेक वर्षपासून मोठया प्रमाणात मागासवर्गीय गरीब वर्ग राहते. हाथमजुरी करून परिवाराचे संगोपन करणाऱ्या या कुटुंबियांचे माती कवेलू चे कच्चे मकान आहे. पावसामुळे, कोयला खदानिच्या दगाणीमुळे व कन्हान नदीला येणाऱ्या पुरा मुळे नागरिकांचे घर पडून केव्हाही जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे.

पाऊसाळ्यात घरात पाणी शिरून कुणी ‘घर देता का घर’ साठी भटकंती करावी लागते. जिल्हा परिषदच्या शाळा, समाजभवन व अंगणवाडी च्या ठिकाणी अशा परिवाराची सोय करण्यात येते. दरवर्षी होणारा हा प्रकार बघणाऱ्यांसाठी ही अत्यंत्त वेदना दायी असते. तर बेघर कुटुंबातील चिमुकल्यांचे ओरडणे, झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाच्या कानावर ही येत नाही. ज्यामुळे शासनाच्या अनेक योजने पैकी घरकुल योजना पासून अजूनही मोठ्या प्रमाणात गरीब वर्ग वंचित आहेत.





