पैशासाठी पत्नीने केला मानसिक छळ
घटस्फोटासाठी अर्ज केला दाखल
पत्रपरिषदेत पतीने सांगितली आपबिती
चंद्रपूर : काही वर्षापूर्वी माझ्याकडून दुसर्या महिलेसोबत झालेल्या शरिरसंबंधाला सामोरे करुन माझी नाहक बदनामी करण्याचा विडा माझ्या पत्नीने उचलला. त्यानंतर तिचेही एका पुरुषासोबत संबंध असल्याची कुणकुण मला लागताच मी याबद्दल माझी चुक मान्य करुन तिलाही समजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतू या बाईने माझे दुसर्या महिलेसोबत अजुनही संबंध आहे तसेच मी तिला शारिरीक व मानसिक दृष्ट्या प्रताडीत करतो अश्या खोट्या तक्रारी पोलिस स्टेशनला देऊन माझी नाहक बदनामी सुरु केली आहे. त्यामुळे मी शारिरीक व मानसिकरित्या पुर्णपणे खचून गेलो असून माझ्याकडून पैसे लुबाडण्यासाठीच तिने हे कटकारस्थान रचल्याचा गंभीर आरोप पती उमाजी रामटेके यांनी श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेच्या माध्यमातून केले.
मध्यंतरी उमाजी रामटेके यांची पत्नी पोर्णिमा रामटेके यांनी माझ्या पतीचे बाहेरील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पत्रपरिषदेच्या माध्यमातून दिली होती. तसेच तो मला प्रताडित करीत असल्याचेही सांगितले. याचा पुरावा म्हणून आपल्या मोबाईलवर त्या महिलेसोबतचे चॅट व अश्लिल व्हिडियो तिने दाखविले. याबाबत खुलासा स्पष्ट करण्यासाठी पती उमाजी रामटेके यांनी पत्रपरिषद घेतली. यामध्ये त्यांनी भुतकाळात घडलेल्या एका चुकीची शिक्षा म्हणून माझ्या पत्नीने केवळ पैसे उकळण्याच्या उद्देशाने माझे अजुनही त्या महिलेसोबत संबंध असल्याची बोंब गावभर उठवली. उमाजी रामटेके आणि पोर्णिमा यांचा विवाह २०१२ मध्ये झाला.पोर्णिमा व उमाजीचा हा दुसरा विवाह होता. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा व पोर्णिमेला पहिल्या पतीपासून एक मुलगी होती. चार ते पाच वर्ष संसार सुखाचा सुरु असतांना एका महिलेसोबत उमाजीचे संबंध प्रस्थापिक झाले. परंतू घरी माहिती पडताच त्यांनी त्या महिलेसोबत असलेले संबंध तोडून टाकले व आपल्या संसाराकडे लक्ष दिले. परंतू पोर्णिमा हिने या घटनेचा फायदा उचलत अश्लिल व्हिडियोचा आसरा घेत पती उमाजी रामटेके यांची बदनामी सुरु केली. याबद्दल उमाजीने पत्नीला वारंवार समजविण्याचा प्रयत्न केला. याचा कळस म्हणून तिनेही एका व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित केल्याची माहिती उमाजी रामटेके यांनी पत्रपरिषदेत दिली. याबाबतही त्याने पत्नीला समजावून सांगितले.परंतू त्याचा तिच्या वागण्यावर कोणताही परिणाम झाला नाही. घराकडे, मुलांकडे लक्ष न देणे, डबा न देणे, रात्ररात्र परपुरुषाशी बोलणे यासारखे तिचे कारनामे सुरुच होते. याबद्दल दोघांमध्ये वादविवादही झाला. परंतू त्याचा गैरफायदा घेऊन तिने पोलिसात तक्रार दाखल करण्यास सुरवात केली. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या अधिकच खचत गेलो. महत्वाची बाब म्हणजे तिच्या मुलीलाही तिचे हे कारनामे माहिती झाल्यावर तिनेही बोलणे सोडून दिले आहे. तीचा आणि माझ्या मुलाचा सांभाळ मी स्वतः करीत असून तो मी करीतच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतू मानसिकरित्या खचल्यामुळे मला शारिरीक व्याधी देखील सुरु झाली. यामुळे मी नाईलाजास्तव घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.




