Home चंद्रपूर *युवा परिवर्तन संघटनेच्या वतीने महिला सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन*

*युवा परिवर्तन संघटनेच्या वतीने महिला सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन*

755

*युवा परिवर्तन संघटनेच्या वतीने महिला सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन*

 मूल: तालुक्यातील नवेगाव भूजला येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने १३ मार्च २०२६ रोजी महिलांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या हेतूने समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या युवा परिवर्तन संघटना नवेगाव भूजला च्या वतीने सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी अनेक महिलांनी एकल नृत्य, सामूहिक नृत्य सादरीकरण केले व एका नटिकेद्वारे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.ग्रामीण भागातील जीवन आजही संपूर्णपणे शेतीवर निर्भर असून दिवसभर शेतातील कामे करायची आणि सायंकाळी मात्र नृत्यांचा सराव करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व माहिलांनी  जीव ओतून मेहनत घेतली व आज ग्रामीण भागातील महिला सुद्धा शहरी भागा च्या तुलनेत मागे नाहीत याची प्रचिती दिली.                                                                  कार्यक्रमाचे उद्घाटन सौ सूलभा अमोल चुदरी  यांच्य हस्ते पार पडलं तर सहउद्घाटक म्हणून सौ. विजया प्रदीप चुदरी होत्या. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ राणी लखन भिवनकर तर सहअध्यक्ष सौ सुलका बंडूजी झाडे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सौ तुलना जितेंद्र चौधरी, सौ अर्चना बस्तीराम चुदरी, सौ श्रीदेवी श्रीकृष्ण पाल, सौ सुनीता अतुल तीवाडे यांच्या हस्ते झालं.                                                            सर्व पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीतानी करण्यात आले. उद्घाटक सौ सुलभा अमोल चुदरी यांनी महिलांना पुरूषांच्या सोबत राहून त्यांच्या प्रगती मध्ये हातभार लावावा असा सल्ला दिला तर  अध्यक्षा सौ राणी लखन भिवनकर यांनी महिला दिनाचे महत्व पटवून दिले. प्रास्ताविक सौ. कुसुम संजय घोगरे यांनी केलं. सूत्रसंचालन कु. समीक्षा संजय घोगरे तर आभार कु. मयुरी चरणदास सतरे हिने मानलं.