संत चंदू बाबा यांची पुण्यतिथी साजरी.
काल दिनांक 14 मे रोजी चंदू बाबा यांची 82 वि पुण्यतिथी दुर्गापुर स्थित त्यांच्या मठात साजरी करण्यात आली. संत चंदू बाबा हे विदर्भातील विशेषता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील एक अत्यंत श्रद्धास्थान असलेले संत होते. संत चंदू बाबांनी साध्या आणि सरळ भाषेत समाजाला सदाचारी शिकवण दिली. त्यांनी जात-पात आणि भेदभाव विसरून माणुसकी ची सेवा करण्याचा संदेश दिला. ते ईश्वराच्या भक्तीत तल्ली असायचे.त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि जनसेवेमुळे त्यांच्याकडे येणारा प्रत्येक भक्त समाधान घेऊन परतत असे. दरवर्षी दुर्गापूर परिसरात त्यांच्या नावाने अनेक उत्सव आणि भंडाऱ्याचे आयोजन केले जाते.भाविक त्यांना श्रद्धेने बाबा म्हणून संबोधत असत.त्यांची मुख्य स्थान मठ किंवा समाधी स्थळ चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात आहे. जिथे दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त 14 मे ला दरवर्षी मोठ्या महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद भंडारा आयोजित केला जातो. त्यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले.या कार्यक्रमासाठी स्थानिक समिती मधील विविध पदाधिकारी यांनी या उत्सवाचे नियोजन शांतता पद्धतीने केले. या महाप्रसादाला बाहेर जिल्ह्यातून तसेच आसपासच्या परिसरातील हजारो संख्येने भक्त उपस्थित होते.




