Home आरोग्य मृत कोरोना वारीयर्स ला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्या : नगरसेविका...

मृत कोरोना वारीयर्स ला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्या : नगरसेविका संध्याताई रायबोले

9

*कोरोना युध्दात मृत झालेल्या प्रभाग 15 तील तीनही फ्रंट लाईन कोरोना वारीयर्स ला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्या*
*नगरसेविका संध्याताई रायबोले यांची जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या कडे मागणी*
——-^^———


कामठी : येथील प्रभाग १५ चे नगर परिषद चे स्वच्छता कर्मचारी विजय गणेश बरोंडे आणि गौतम नगर छावणी येथील सौ विणाताई धम्मरत्न तांबे, तिरंगा चौक रामगढ येथील लक्ष्मीताई रामकृष्ण ऊके या तीन अंगणवाडी सेविकाचा कोरोना प्रार्दुभावाने खासगी इस्पितळात उपचारा दरम्यान अकाली मृत्यू झाला असून या तीनही फ्रंट लाईन हेल्थ वर्कर ला शासन नियमानुसार प्रत्येकी 50 लाख रुपयांचे विमा कवच देऊन मदत करावी अशी मागणी प्रभाग 15 च्या नगरसेविका संध्याताई उज्वल रायबोले यांनी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे
यांना निवेदना द्वारे केली आहे.
    यावेळी जि प चे सीईओ योगेश कुंभेजकर,एसडीओ श्याम मदनूरकर,सिओ संदिप बोरकर, तहसीलदार अरविंद हिंगे उपस्थित होते.