Home Breaking News ७१ युवकांनी रक्तदान व २० गुणवंत विद्यार्थ्यी सत्काराने स्वातंत्र दिन थाटात साजरा...

७१ युवकांनी रक्तदान व २० गुणवंत विद्यार्थ्यी सत्काराने स्वातंत्र दिन थाटात साजरा भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था व्दारे भव्य रक्तादान शिबीराचे आयोजन 

9

७१ युवकांनी रक्तदान व २० गुणवंत विद्यार्थ्यी सत्काराने स्वातंत्र दिन थाटात साजरा

भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था व्दारे भव्य रक्तादान शिबीराचे आयोजन 

कन्हान,ता.१६

   १५ ऑगस्ट ७८ वा भारतीय स्वातंत्र दिना निमित्य भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था व्दारे तारसा रोड, कन्हान येथे आयोजित भव्य रक्तदान शिबीरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले व २० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून स्वातंत्र दिन थाटात उत्साहात पार पडला.

    दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा १५ ऑगस्ट २०२४ ला ७८ व्या भारतीय स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था कन्हान व्दारे महाकाली कॉम्पलेक्स, तारसा रोड, कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी १० वी व १२ वी च्या २० गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थे व्दारे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून स्वातंत्र दिन थाटात उत्साहाने साजरा करण्यात आला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षा कन्हान नगरपरिषद अध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर, प्रमुख अतिथी चंद्रशेखर आरगुलेवार, विशेष अतिथी माजी आमदार मालिकार्जून रेड्डी, पर्यटक मित्र चंद्रपाल चोकसे, रमेश कारेमोरे, राजेश ठाकरे, नरेश बर्वे, शा.राजेंद्र बावनकुळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

     इंदिरा गांधी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्त पेढी नागपुर च्या डॉक्टर व चंमुनी रक्त संकलन केले. कार्यक्रमास विशेष सहकार्य तपस्या फाऊंडेशन रामटेक, शिवराय ग्रुप खंडाळा (घ.), अपोलो अकॅडमी कन्हान (नगरधन), शिवाजी नगर मित्र परिवार, एम.जी.एस. संविधानिक हक्क संघटन कन्हान यांचे लाभले.

    तर कार्यक्रमाच्या यशस्वी करिता भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था कन्हान चे अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर, उपाध्यक्ष समशेर पुरवले, हरिष तिडके, भरत चकोले, सचिव रजनिश (बाळा) मेश्राम, सहसचिव अशोक नारनवरे, कोषाध्यक्ष सुनिल लक्षणे, सदस्य मृणाल सरोजकर, आशिष वानखेडे, रामभैया थदानी, मंगेश धोटे, मयुर माटे, अनिकेत नानोटे, श्रीकृष्णा माकडे, सुमेध नितनवरे, मनिष पाली, योगेश शेंडे, करण पाली, तेजस लक्षणे, नितिन कटरे, सचिन कटरे, निशांत ठाकरे, राधेश्याम राउत, शैलेश ढोके, राजु चोपकर, किशोर नांदुरकर, नंदु बारई सह युवा कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले. भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर यांनी रक्त दातांचे विशेष आभार मानले.