७८ वा स्वातंत्र दिन ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व शेतकरी कष्टकरी महासंघा व्दारे थाटात साजरा
कन्हान,ता.१६
विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट, ग्रामौन्नती प्रतिष्ठाण आणि शेतकरी कष्टकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार प्रकाश जाधव यांचे निवास स्थान विवेकानंद नगर, कन्हान येथे ७८ वा स्वातंत्र दिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

गुरूवार (दि.१५) ऑगस्ट ला सकाळी ९.३० वाजता विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट, ग्रामौन्नती प्रतिष्ठाण आणि शेतकरी कष्टकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार प्रकाश जाधव यांचे अध्यक्षेत भारत मातेच्या प्रतिमेचे देशमुख गुरूजी यांच्या हस्ते, महात्मा गांधीच्या प्रतिमेचे डॉ.श्रीकृष्ण जामोदकर यांचे हस्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे नगरसेविका मोनिका पौनिकर यांच्या हस्ते आणि राष्ट्रध्वजाचे सेवानिवृत्त सैनिक प्रविण सातदेवे यांचे हस्ते पुजन करून नगरपरिषद स्वच्छता सुपरवा ईझर जावेद यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवुन सलामी देऊन राष्ट्रगीत घेण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त भारतीय सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर नगरसेविका रेखा टोहणे, पुष्पा कावडकर, राखी परते, माजी जि.प.उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिवसेना (उबाठा) पारशिवनी तालुकाध्यक्ष कैलास खंडार, बाबाराव दुपारे आदी मान्यवरांनी स्वातंत्र्यांचा गुणगौरव करित उपस्थिताना मार्गदर्शन केले. आपला देशाला स्वातंत्र करण्याकरिता हजारो स्वातंत्र सैनिक, देशभक्तानी आपल्या प्राणाची आहुती देऊन देश स्वातंत्र केला. आता ७७ वर्षे हो़ऊन सु़ध्दा भारतीय नागरिकांची पाहिजे त्याप्रमाणे विकास नाही. सुरूवातीला पाहिजे तशी साधन सामुग्री नसताना सुध्दा सत्तेचे विकेंद्रीकरण करून तळागाळातील सर्व नागरिकांचा विकास साधण्याचे ध्येय गाठण्याचा मुलमंत्र होता. परंतु आता सत्तेचे केंद्रीयकरण होत गरिब गरिबच होत, मोजके विशिष्ट मंडळी श्रीमंत होत असमानता, शहराच्या तुलनेत ग्रामिण गाव खेडयात विकासात दुजाभाव दिसत आहे. यामुळे बेरोजगारी, महागाईने नागरिक, युवा, शेतकरी, महिला त्रस्त असल्याने न्याय हक्का करिता सर्वानी एकत्र येत अन्याया विरूध्द पेटुन उठुन लढा देऊ तरच आपली येणारी पिढी सुरक्षित करू शकु असे आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शनात प्रकाश जाधव यांनी संबोधित केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन रविंद्र चकोले यांनी तर ग्रामोन्नती प्रतिष्ठाण सचिव मोतीराम रहाटे यांनी आभार मानले. याप्रसंगी सेवानिवृत्त सैनिक शेरूभाई शेख, रवि रंग, अंबास्कर, डॉ. योगेश जुनघरे, किशोर बेलसरे, गणे़श पानतावने, नगरसेविका गुंफाताई तिडके, लोक कलावंत निशाताई खडसे, पत्रकार कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, सुर्यभान फरकाडे, सतिश घारड, विवेक पाटील, आकाश पंडितकर, रविंद्र दुपारे, किशोर वासाडे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, विनय यादव, शांताराम जळते, पटले सर, एकनाथ खर्चे, नथुजी चरडे, रूमदेव मानकर, किशोरी अरोरा, ताराचंद निंबाळकर, विठ्ठल मानकर, रतिराम सहारे, बालाजी नायर, ज्ञानेश्वर दारोडे, अखिलेश मेश्राम सह सेवा निवृत्त सैनिक, शिक्षक, कर्मचारी, जेष्ठ नागरिक, व्यापारी, आशा वर्क्स, अंगण वाडी सेविका, सामाजिक राजकिय पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.






