श्री नारायण विद्यालयाने ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
कन्हान,ता.१५
श्री नारायण विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्यदिन श्री नारायण विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण समारंभ डॉ.विश्वेश्वर जुनघरे यांच्या अध्यक्षतेखाली एन.बाबु नानन अध्यक्ष श्री नारायण मानव सेवा व शिक्षण प्रसारक मंडळ, कन्हान यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी भारतातील सर्व राज्ये आणि धर्मांच्या वेशभूषेत संगीत आणि देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले.





