Home क्राईम अवैधरित्या तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक

अवैधरित्या तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक

10

अवैधरित्या तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक

कन्हान,ता.१३ डिसेंबर
पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केमीकल ग्राउंड कन्हान येथे अवैधरित्या लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकांकडून तलवार जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१२) डिसेंबर रोजी रात्री १० ते १०:३० वा. च्या दरम्यान शैलेश राजाराम वराडे हे आपल्या स्टाॅप सह पो.स्टे. परिसरात सरकारी वाहनाने पेट्रोलिंग ड्यूटी करीत असतांना‌ गुप्त ‌‌‌‌माहितीनुसार, केमीकल ग्राउंड जवळ एक युवक पायी फिरत असुन त्याच्या जवळ तलवार सारखे शस्त्र दिसत आहे अशी विश्वसनीय मिळालेल्या माहितीनुसार पो.ना शैलेश वराडे हे आपल्या स्टाॅप सह केमीकल ग्राउंड येथे पोहचले असता पोलीसांना एक युवक आपल्या कंबरेच्या डाव्या बाजुला एक लोखंडी तलवार घेवुन जातांना दिसला. पोलीसांना पाहून युवक पडत असताना पोलीसांनी पाठलाग करुन घेराव टाकुन अटक करून तलवार ताब्यात घेतली. युवकाचे नाव पियुष नामदेव रंगारी (वय १९) रा.पिपरी, कन्हान पोलीसांनी आरोपी पियुष रंगारी यास ताब्यात घेऊन पोस्टे पो.ना शैलेश राजाराम वराडे यांचा तक्रारी वरून आरोपी पियुष रंगारी यांचा विरुद्ध अप क्रमांक ७१४/२२ कलम ४.२५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पो. का. अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .