आज महाशिवरात्री महोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान,ता.१७ फेब्रुवारी
पारशीवनी तालुक्यातील ग्रामीण भागात महाशिवरात्री महोत्सव विविध कार्यक्रमा सह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने या वर्षी देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जुनी कामठी कामठेश्वर महादेव मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम

जुनी कामठी येथील कामठेश्वर महादेव मंदिरात श्री शिव मंदिर देवस्थान समिति द्वारे महाशिवरात्रि महोत्सव निमित्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि.१८) फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता पासून “अखंड रामायण” आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री उत्सवा निमित्त पहाटे ३ वाजता पासून श्री भगवान कामठेश्वर महादेवाला मा.प्रकाशजी सिरीया , मा.जयरामजी पारवानी यांच्या हस्ते अभिषेक करुन दर्शनाला सुरुवात होणार आहे.
रविवार (दि.१९)फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता केजाजी महिला भजन मंडळ, जुनी कामठी द्वारे गोपाल काला, सकाळी १०:३० वाजता ह.भ.प. उमेश महाराज बहुरूपी (वरुड) यांचे कीर्तन कार्यक्रम, सकाळी ११:०० वाजता श्री शिव मंदिर देवस्थान समिति द्वारे आभार प्रदर्शन आणि दुपारी १ वाजता ते रात्री ९ वाजता पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री शिव मंदिर देवस्थान समिती द्वारे करण्यात आले आहे.




