भीमजयंती महोत्सव बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी व जयंती समिती व्दारे थाटात

कन्हान : – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती महोत्सव बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कन्हा न यांच्या सयुक्त विद्यमाने भीमगीत, केक व फटाक्यां ची आतिष बाजी, माल्यार्पण, भव्य रोग निदान शिबीर, भोजनदान आणि भव्य महारैली काढुन डॉ बाबासाहेब आबेंडकर यांची चार दिवसीय जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.








