Home चंद्रपूर *राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयास पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट* *वाढत्या...

*राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयास पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट* *वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर निवेदन स्वीकारून सकारात्मक व कठोर कारवाईचे आश्वासन*

32

*राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयास पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट*

*वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर निवेदन स्वीकारून सकारात्मक व कठोर कारवाईचे आश्वासन*

जिवती (कृष्णा चव्हाण ):
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या प्रदूषणाच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठकीसाठी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे यांचे काल राजुरा विधानसभा मतदारसंघात आगमन झाले. यावेळी त्यांनी आवर्जून राजुरा येथील भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालय तथा मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रास सदिच्छा भेट दिली.

प्रसंगी आदरणीय श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार हेही उपस्थित होते.
राजुरा शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात बांबूपासून तयार करण्यात आलेली आकर्षक फोटोफ्रेम देऊन पंकजाताई मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. “सेवा तिथे भाजप – गरज तिथे कार्यकर्ता” हे ब्रीद उराशी बाळगून या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेसाठी निःशुल्क आणि सातत्यपूर्णपणे राबविण्यात येत असलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.

पंकजाताईंनी कार्यालयामार्फत सुरू असलेल्या जनहिताच्या उपक्रमांची आत्मीयतेने माहिती जाणून घेतली व या सेवाकार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मतदारसंघातील वाढत्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नासंदर्भात त्यांना सविस्तर निवेदनही सादर करण्यात आले. या निवेदनाची दखल घेत संबंधित विषयावर सकारात्मक आणि कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राजुरा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांबाबत कार्यालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या भेटीमुळे नवी ऊर्जा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.