Home कृषी शेतकरी कष्टकरी महासंघाची जनजागृती संवाद बैठक संपन्न

शेतकरी कष्टकरी महासंघाची जनजागृती संवाद बैठक संपन्न

9

शेतकरी कष्टकरी महासंघाची जनजागृती संवाद बैठक संपन्न

कन्हान,ता.१८ जानेवारी

     पारशिवनी तालुक्यातील पेंच नदी काठावरील मेहंदी गावात शेतकरी, कष्टकरी महासंघाची जनजागृती संवाद बैठकीला गावातील शेतक-यानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हितार्थ लढयात सहकार्य व सहभागी होण्याची हमी व समर्थन केले.

     आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करीत असुन कृषी प्रदान देशात शेतकरी दैना अवस्थेत येऊन पोहचला आहे. तरी कुणीही शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर बोलताना दिसत नसल्याने बळीराजाची दैना अवस्था निर्माण झाल्याने रामटेक लोकसभा माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात ” शेतकरी कष्टकरी महासंघाची स्थापना करून पहिल्यांदा नागपुर जिल्हा व रामटेक लोकसभा अंतर्गत ग्रामीण भागातील गावामध्ये शेतकयांच्या भेटी, संवाद सभा व बैठकी घेऊन हित गुज करित जनजागृती कार्यक्रमांतर्गत पारशिवनी तालुक्यातील पेंच नदी काठावरील मेंहदी गावातील मॉ दुर्गा मंदिराच्या आवारात माजी खासदार प्रकाश जाधव, डॉ वराडे,  चंद्रभान महाराज बेहुणे, वासुदेव खंडाते, ज्ञानचंद देवळे, विठ्ठलजी ठाकुर, दिलीप राईकवार आदींच्या प्रमुख उपस्थित गावातील शेतक-याशी संवाद साधुन जनजागृती करण्यात आली.

  आपल्या भारत देशात झालेली कृषी क्रांती प्रत्यक्ष अमलात आणण्याकरिता आता फक्त लढाई फक्त पोशिंद्यासाठीच करायची असुन जोपर्यंत शेतमाला ला योग्य भाव मिळत नाही. शेतीला कृषी एक्स प्रेस फिडर ने नियमित विज पुरवठा करून विधृत मिटर लावुन विधृत बिल घेण्यात येत नाही. पेंच धरण शेतक-या करिता असुन सुध्दा जिल्हयातील शेतीला फक्त ५ ते १० टक्के पाणी मिळते, त्यामुळे मुबलक पाणी सिंचना करिता मिळावे. शेत विमा, शेतकऱ्यांना हक्काचे न्याय मिळण्यास विशेष शेतकरी न्यायालया ची स्थापना व्हावी. राज्य व केंद्रात शिक्षक, पदविधर, सांस्कृतिक जनप्रतिनिधीची जशी निवड होते. त्याच प्रमाणे शेतक-यांचे जनप्रतिनिधीची सुध्दा निवड करण्यात यावी. या सर्व शेतकरी, कष्टक-यांच्या न्याय हिताच्या बाबी पुर्ण करण्याकरिता शेतक-यांना एकत्र एकसंघ करून एक नवी चळवळ उभी करित शेतक ऱ्यांवरील समुळ अन्याय नष्ट करे पर्यंत आत्ता थांबणे नाही. असे प्रखर संबोधन प्रकाश जाधव यांनी केल्याने येथिल शेतक-यात नवचैत्यण निर्माण होत गावकरी शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद देत शेत क-यांच्या हितार्थ लढ्यात सहकार्य व सहभागी होण्याची हमी दिली. या संवाद बैठकीच्या यशस्वितेसाठी चंद्रभान महाराज बेहुणे, वासुदेव खंडाते, योगेश कोठेकर, हिरालाल दुबे, केशरीचंद तील्लेकर, अरविंद वासनिक, अनिल मेश्राम, प्रेमकुमार गजभिये, संजय शिंदेकर, अनिल शिंदेकर, धनराज शिंदेकर, किशोर कोठेकर, रामलाल तील्लेकर, हरी तिल्लेकर, राजु बेहुणे, अमरनाथ बेहुणे, लखन खंडाते, नितेश दुबे, मनोहर तील्लेकर, रूपेश सातपुते, बंटी हेटे, पुरूषोत्तम येणेकर, शिव स्वामी आदीसह गावक-यांनी सहकार्य केले.