
घाटंजी : आंबेझरी कोच्ची धरणातील पाणी पूर्णपणे भरल्यामुळे आंबेझरी ते आसोली पांदण रस्त्यावरील नाल्याच्या वरून 6 फूट पाणी वाहत आहे त्यामुळे आंबेझरी येथील शेतकरी पूर्ण पने हतबल झाले होते, 35 ते 40 शेतकऱ्यांच्या कुटुंबाची शेती बुडण्याची वेळ येऊ नये करिता VJNT सेल चे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, बंजारा टायगर्सचे शहर अध्यक्ष संजय आडे, यांच्या पुढाकाराने आज दिनांक 16/9/21 रोजी अधीक्षक अभियंता पाटबंधारे प्रकल्प मंडळ यवतमाळ यांना भेटून प्रकरण ताबडतोब निकाली लावावे अन्यथा त्याच पाण्यात जलसमाधी घेऊ असे निवेदन देण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षक साहेबानी ताबतोब धरणातील पाणी सोडण्याचे आदेश दिले व समोर चालून त्वरित पूलाचे बांधकाम करून देण्याचे आस्वासन दिले, या प्रसंगी VJNT सेल चे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, राष्ट्रीय बंजारा टाईजर्स चे शहर अध्यक्ष संजय आडे,आंबेझरी येथील सरपंच निळू राठोड,सदस्य राजू राठोड,कृष्णा राठोड,दिनकर चव्हाण,बंधू राठोड,मोहन हरी जाधव,दीपक जाधव,भावराव राठोड,विलास राठोड, नंदू चव्हाण, बंडू जाधव,देविदास चव्हाण,बादल राठोड व आंबेझरी येथील गावकरी मंडळी उपस्थित होते.




