Home नागपुर कल्पवृक्ष ट्री संस्थेतर्फे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वृक्षदान

कल्पवृक्ष ट्री संस्थेतर्फे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वृक्षदान

9

कल्पवृक्ष ट्री संस्थेतर्फे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वृक्षदान

 

नागपूर,ता.२० फेब्रुवारी

     श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कल्पवृक्ष ट्री संस्थेतर्फे वृक्षदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये तुळशीचे रोप दान करण्यात आले.

    तुळशीचे रोप दान करण्यामागे एकच उद्देश लोकांना वृक्ष लागवडीच्या कामासाठी प्रवृत्त करणे हा आहे. आज ज्या प्रकारे वृक्षतोड केली जात आहे, जंगले नष्ट केली जात आहेत, त्यामुळे येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी कल्पवृक्ष ट्री संघटनेने एक छोटेसे प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.

     हा उपक्रम दरवर्षी कल्पवृक्ष ट्री संघातर्फे आयोजित केला जातो. या वेळी कल्पवृक्ष संस्थेसह रायसोनी ग्रुप ऑफ कॉलेजेस नागपूर व झुलेखा कॉलेज नागपूर यांचे सहकार्य लाभले.यावर्षी ४०० तुळशी रोपांचे वृक्षदान करण्यात आले. हा कार्यक्रम कल्पवृक्ष ट्री संघाच्या सर्व सदस्यांनी घेतला.