अवैद्यरित्या जनावरे कत्तलीकरिता वाहतुक करणारे दोन वाहन जप्त
४३ गौवंश जनावरा सह १४,१९,००० रू.चा मुद्देमाल जप्त, ५ आरोपीवर गुन्हा दाखल
कन्हान,ता.१९
पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस विशेष पथक नागपुर ग्रामिणच्या पथकाने कन्हान ते नागपुर कडे कत्तलीकरिता अवैद्यरित्या वाहतुक करताना सिहोरा शिवारात दोन पिकअप वाहनात निर्दयतेने आखुड दोराने पाय बांधुन कोंबुन ४३ जनावरे गाय, बैल नेताना दोन वाहन चालकास पकडले. त्यांचा ताब्यातुन दोन पिकअप वाहन व ४३ गौवंश जनावरे असा १४ लाख १९ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करित ५ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून ४३ गौवंश गाय, बैल, कारवड व गौरे यांना पोलिसांनी जिवनदान दिले.
पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने मंगळवार (दि.१९) सप्टेंबर ला पहाटे ३.१६ वाजता जिल्हा विशेष पथक नागपुर ग्रामिणचे पोलिस उपनिरिक्षक अमित पांडेय सह रामटेक पोस्टे चे पो.हवा नारायण भोयर, पोना पुरुषोत्तम काकडे, कन्हान पोस्टे चे पोशि वैभव बोरपले, पोशि निखिल मिश्रा यांचे पथक तपास कामा सह अवैध्य धंद्यावर कार्यवाही करणे कामी रात्रपाळी गस्तीवर असताना खात्रीशीर माहीती मिळाली की, कन्हान हद्दीतील सिहोरा शिवारातुन कामठी येथिल जिया कुरेशी हा त्याचे जानावराच्या ठिय्यावरून अवैधरित्या गौवंश जनावरे कत्तलीकरिता वाहनात निर्दयतेने भरून वाहतुक करणार आहे.

अशा माहितीवरून सिहोरा शिवारात जनावराच्या ठिय्यावर रेड केली असता ४ ईसम दोन पिकअप वाहणासह दिसुन आले. त्या पैकी अंधाराचा फायदा घेवुन पोलीसांना पाहुन दोन ईसम पळाले तर दोन ईसम घटनास्थळी मिळुन आले. सदर मालवाहु वाहणापैकी एक पिकअप वाह न क्र. एमएच ४९ एटी ८६८१ मध्ये लहान मोठे लाल पांढ-या रंगाचे एकुण आठ जणावरे दोराने निर्दयतेने पाय बांधुन कोंबुन भरलेले मिळुन आले. तर दुसरा पिकअप वाहन क्र.एमएच २५ पी ५८२५ मध्ये जनावरे भरण्याच्या ठिय्यावर खाली दोरा ने चारापाणी न देता निर्दयतेने जनावरे बांधलेली मिळुन आले. मो.तालीब खान वल्द मोहम्मद खान वय २२ वर्ष रा. कामठी माल वाहु वाहन एमएच ४९ एटी ८६८१ चा चालक असुन गोवंश वाहनात भरण्यास मदत करतो. व जुबेर खान वल्द हफिज खान वय २६ वर्ष रा. कामठी माल वाहु वाहन क्र.एमएच २५ पी ५८२५ चा चालक असुन गोवंश वाहनात भरण्यास मदत करतो.






