रेल्वे ओव्हर ब्रीज नियम बाह्य असल्याने मनुष्य वधाचा गुन्हयाची मागणी
कन्हान, ता. १९ डिसेंबर
कन्हान तारसा रोड वरील रेल्वे ओव्हर ब्रीज नियम बाह्य बनलेला असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला असून जर का? त्यामुळे जीवित हानी झाली तर संबंधित व्यक्तिन वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

भारतीय जनता पार्टी कन्हान शहर तर्फे भाजपा तालुका अध्यक्ष, रिंकेशजी चवरे जिल्हा महामंत्री भाजपा योगेश वाड़ीभस्मे नागपुर ग्रा.यांच्या नेतृत्वात भाजपा कन्हान शहर अध्यक्ष विनोद किरपान यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांना निवेदन देण्यात आले.





