Home नागपुर वीजापूर आखाड्यात शिवरायांच्या इतिहासाची प्रचीती 

वीजापूर आखाड्यात शिवरायांच्या इतिहासाची प्रचीती 

9

वीजापूर आखाड्यात शिवरायांच्या इतिहासाची प्रचीती

कन्हान,ता.२१ फेब्रुवारी

     वि‌जापूर येथे शिवजयंती निमित्त आखाड्याचे भवानी ग्रुप यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

     शिवाजी महाराजांची रूढी, परंपरा, कला, जिवंत राहावी‌ याकरिता छोटासा प्रयत्न म्हणून तरुण सागर नवघरे यांनी गावातील लहान मुला मुलींना‌ आखाड्याचे प्रशिक्षण दिले. विजापूर भवानी ग्रुप यांची कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी उमेश नवघरे, प्रज्वल नवघरे, रोशन नवघरे,रोहित तुरनकर, मोहित मेश्राम, आदित्य राऊत, क्रिश केडेकार, हर्षल बोन्द्रे, ख़ुशी बोन्द्रे, ऋतिका कुरडकर, इशिका तुरणकर, काजल नवघरे, गुंजन नवघरे या मुला मुलींनी आखाड्यात सहभाग घेऊन आपली कला दर्शिवली.