Home Breaking News भरदिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिन्यांवर हातसाफ

भरदिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिन्यांवर हातसाफ

9

भरदिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिन्यांवर हातसाफ

कन्हान, ता.२१ डिसेंबर

     प्रगती नगर, सुपरटाऊन, कन्हान येथे भरदिवसा चोरांनी घराचा दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व नगदी रुपये सहीत एकुण ७८,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने पोलीसांनी सोनु सहारे यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   प्राप्त माहिती नुसार, मंगळवार( दि.२०) डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता च्या दरम्यान सोनु आनंदराव सहारे (वय -३१) रा.प्रगती नगर, गहु हिवरा रोड, सुपर टाऊन कन्हान आपल्या आई-वडील व परिवारा सोबत घराला कुलुप लावुन काचुरवाही येथे वहिणीचा अंत्तविधीला गेले होते .

    सोनु हा काचुरवाही येथे पोहोचल्यावर अंदाजे दुपारी ३:२० वाजता च्या दरम्यान सोनु याला त्यांचा घराशेजारी राहणाऱ्या काकु सुनिता राजकुमार मेश्राम यांनी फोन करून सांगितले की “तुमचा घराचा दरवाजा उघडा असून दरवाज्याचे कुलूप तोडलेला आहे”. त्यामुळे सोनु व त्यांचे काका राजकुमार मेश्राम हे काचुरवाही वरून घरी परत आले. घरी आल्यावर सोनु यांना घराचा दरवाजा उघडा दिसला व दरवाजाला लावलेला‌ कुलूप बाजुला पडलेला दिसला. घराचा आत जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्तव्यस्त पडल्याचे दिसुन आले. बेडरुम मधील लोखंडी आलमारीचा दरवाजा वाकलेला होता. आलमारीत ठेवलेले सोन्याचे पदक ५ ग्रॅम, सोन्याचे पदक ३ ग्रॅम, सोन्याचे मनी १० ग्रॅम , सोन्याच्या लहान काठी ५ ग्रॅम, लहान काठीचे मनी २.५ ग्रॅम असा एकुण २५.५ ग्रॅम सोन्याचे दागीणे जुने वापरते किमंत अंदाजे ७३,५०० रु व नगदी ५,००० रु असा एकुण ७८,५०० रु किंमती चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा आत प्रवेश करुन चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी सोनु सहारे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३८० , ४१४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .