शहरातुन सुरू असलेली जड वाहतुक बंद करण्याची मागणी
टोल वाचवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याला व जिवाला धोका
जड वाहतुकिने धुळीचे साम्राज्य, अपघातास निमंत्रण
कन्हान,ता.२१ जानेवारी
भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था व नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगरपरिषद प्रशासनाची भेट घेऊन या मार्गावर अवजड डंपर व लांबच लांब जड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली.

राष्ट्रीय चारपदरी नागपुर बायपास महामार्ग सुरू झाल्यापासुन कन्हान शहरातील जड वाहतुकीस बंदी असुन सुध्दा बिनधास्त शहरातुन कोळसा, रेती, गिट्टी, राख, सल्फेट ची दहा चाकी ते वीस चाकी ट्रकने जड व ओव्हर लोड वाहतुक सुरू असल्याने शहरातील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
तारसा रोड वरील रेल्वे उडाण पुल सुरू झाल्यापासुन जड वाहतुकीत वाढ होऊन अपघात वाढुन मोठया अपघाताची दाट शक्यता वाढल्याने कन्हान शहरातुन जड वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी.






