Home Breaking News कन्हान पोलीसांनी शहरात काढला रुट मार्च सण उत्सव शांततेत साजरे करा,...

कन्हान पोलीसांनी शहरात काढला रुट मार्च सण उत्सव शांततेत साजरे करा, पोलीसांचे नागरिकांना आव्हान

9

कन्हान पोलीसांनी शहरात काढला रुट मार्च

सण उत्सव शांततेत साजरे करा, पोलीसांचे नागरिकांना आव्हान

कन्हान,ता.,२१

    कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात सण उत्सव दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडु नये व शांतता , सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने कन्हान पोलीसांनी शहरात रुट मार्च काढुन सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आव्हान पोलीसांनी नागरिकांना केले आहे.

   बुधवार (दि.२०) सप्टेंबर ला सायंकाळी ५:०० वाजता ते ७:०० वाजता पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक भटकर, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात आगामी गणेश उत्सव, ईद ए मिलाद व आदि सण उत्सव दरम्यान शहरात आणि ग्रामीण भागात कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावे म्हणुन कन्हान पोलीसांनी शहरात रुट मार्च काढला.

‌‌    रुट मार्च गांधी चौक, मटन-मच्छी मार्केट, पटेल नगर, पिपरी होऊन, राष्ट्रीय महामार्गा वरील आंबेडकर चौक, तारसा चौक, सात नंबर नाका, कांद्री, टेकाडी होऊन परत राष्ट्रीय महामार्गा ने भ्रमण करीत रुट मार्च चे पोलीस स्टेशन येथे समापन करण्यात आले. प्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन चे क्राईम पोलीस निरीक्षक यशवंत कदम, सपोनि चेतन चौहान, सपोनि राजेश जोशी, सपोनि पराग फुलझेले, पोउपनि सिमा बेंद्रे, पोउपनि शालीकराम महाजन (खुपीया) यांचा सह २२ पोलीस अमलदार, १८ एस.आर.पी.एफ.अमलदार, आर.सी.पी.पथक व २० होमगार्ड उपस्थित होते .