सार्वजनिक वाचन कक्षात वाचक प्रेरणा दिन
कन्हान,ता.२१
माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती हनुमान नगर कन्हान येथील सार्वजनिक वाचन कक्षात वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.

विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, वाचन कक्षाचे संचालक प्रकाश नाईक, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर अवचट यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांनी डॉ.कलाम यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
राजेंद्र खंडाईत यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन चरित्रावर आणि साध्या वागणुकीवर प्रकाश टाकला. उपस्थित वाचकांकडून ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला व त्यांना पुस्तक वाचन हे जीवनकल्याणाचे माध्यम समजावून सांगण्यात आले.






