Home आरोग्य येसंबा ग्रां.पं.कार्यालयात नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीर 

येसंबा ग्रां.पं.कार्यालयात नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीर 

9

येसंबा ग्रां.पं.कार्यालयात नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीर

कन्हान,ता.२३ जानेवारी

    येसंबा ग्राम पंचायत कार्यालय येथे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड द्वारे नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करून ७० नागरिकांच्या नेत्राची तपासणी करण्यात आली. आठ दिवसा नंतर चष्मे वाटप होणार असल्याची माहिती उपसरपंच धनराज हारोडे यांनी दिली.

      ग्राम पंचायत येसंबा कार्यालय येथे वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड द्वारे नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीरा चे आयोजन करून वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड चे डाॅक्टर दीपा वासनिक, डॉक्टर ससी शंकर सिंग यांच्या चंमु च्या सहकार्याने एकुण ७० नागरिकांच्या नेत्राची तपासणी करण्यात आली. आठ दिवसांनी चष्मे वाटप होणार असल्याची माहिती उपसरपंच धनराज हारोडे यांनी दिली. शिबीराच्या यशस्वितेकरिता येसंबा ग्राम पंचायत सरपंच कु.सोनुताई इरपाते, उपसरपंच धनराज हारोडे सह ग्रां.प. सदस्य, सदस्या व कर्मचा-यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.