श्री शिव महापुराण समिती व्दारे भव्य शोभायात्रा, राममय
कन्हान,ता.२३ जानेवारी
तिळ संक्रांत चतुर्थी महोत्सवा निमित्य श्री शिव महापुराण समिती व्दारे पांधन रोड, गणेश मंदीर सामोरील प्रांगणात श्री शिव महापुराण कथा व श्री राधानाम रस प्रवाहचे भव्य शोभायात्रा व्दारे शुभारंभ करण्यात आले.

(दि.२१) जानेवारी ते (दि.१) फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकानी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष राजु बाबु राठी यांनी केले आहे.

श्री शिव महापुराण समिती कन्हान व्दारे रविवार (दि.२१) जानेवारी ला सकाळी ११ वाजता मंगल कलश यात्रा श्री गणेश मंदिर सामोरिल कैलास धाम येथुन काढुन यात शेकडो डोक्यावर कलशधारी महिला, श्री राम, लक्ष्मन, सिता व श्री हनुमान यांचे सुंदर पात्र रथा मध्ये मनमोहित करित होते.

राम सेतु, तांडव नुत्य व भगवाधारी गरबा नुत्य शो़भारात्रेचे विशेष आकर्षण होते. कन्हान शहर भगव्या ध्वजानी सुशोभित करण्यात आले.

दर्शना करिता महामार्गाच्या दोन्ही कडे भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांनी घरासमोर रांगोळी, सजावट, पाणी पाऊच, बिस्किट, बुंदा, बासुंदी , प्रसाद वितरण आणि फुलांचा वर्षावात भव्य स्वागत केले.






