छत्तीस वर्षानंतर जुळून आले मैत्रीचे रेशीमबंध. जी. प. शाळेच्या 1990बॅच चे स्नेहमीलन. जिवलग मित्रांच्या प्रदीर्घ भेटीने जुन्या आठवणींना उजाळा. ——————————————–राजूरा (प्रतिनिधी ):- शालेय जीवन हे अनेकांच्या जीवनातला हळवा कप्पा.जवाबदारी चे ओझे खांद्यावर येण्यापूर्वी जीवनाचा मुक्त आस्वाद घेण्याचा हा काळ अनेकांनी मनसोक्त अनुभवला. परंतु एका विशिष्ठ कालावधीनंतर हा काळ ओसरला व जवाबदारी व कर्तव्याचे निर्वाहन करण्यासाठी प्रत्येकानी आपल्या वाटा निवडल्या व सुरक्षित घरटे सोडून सर्व जण आपल्या वाटेने निघून गेले. काही नजरेच्या टप्प्यात होते काही ह्या टप्प्याच्या बाहेर जाऊन दृष्टी आड झाले. तब्बल छतीस वर्षानी वयाची पन्नासी ओलानडल्यानंतर ह्यांच्यातील अविनाश ढुमने ह्यांनी आपल्या जुन्या मित्रांचा शोध सुरु केला आणी तब्बल साढे तीन दशकानंतर जी प राजूरा शाळेतील 1990 बॅच चे हे विध्यार्थी राजूरा जवळील चनाखा येथील मोकळा स्वास ह्या कृषी पर्यटन स्थळावर एकत्रित आले. दिनांक एकोणीस फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा जयंती दिन असल्याने सर्वांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले त्यानंतर शालेय जीवनातील मित्र व शिक्षक ज्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि मग उघडला आठवणींचा पिटारा. आपल्या अनुभवा ची शिदोरी व संघर्ष उलगडताना अनेकजण भावना विवश झाले. विशेष करून शालेय जीवनातील मैत्रिणी ज्यांना गेल्या छतीस वर्षात बघितलेच नव्हते त्यांना बघून आणी त्यांच्यातील अनेकांच्यात झालेले बदल बघून अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्यचे भाव होते. ह्या मित्रमैत्रिणींचा शोध घेताना अनेक जण आपल्याला सोडून ह्या जगातून कायमचे सोडून गेल्याची दुःखद वास्तविकतेने अनेकांचे डोळे पाणावले. ह्या निमित्याने विविध खेळ व ह्या पर्यटन केंद्रातिल साहसी खेळ खेळून सर्वांनी आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी आपल्यातील सुप्त गुणांची ओळख आपल्या वर्गमित्रांना करून दिली. भोजनानंतर पर्यटन केंद्राचा निरोप घेऊन सर्वांची पावले शाळे कडे वळली. ह्या बॅच चे विध्यार्थी शिकत असताना शाळेची जी इमारत होती ती आता मोडकळीस आली असून त्या जागी बाजूला नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. पण ह्या मोडकलीस आलेल्या इमारतीत फिरून सर्वांनी आपले वर्ग,बसण्याचे ठिकान,तेव्हाचे शिक्षक वृंद ज्यातील अनेकांनी आता जगाचा निरोप घेतलाय त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. फोटोच्या माध्यमातून आपल्या ह्या भेटीची शिदोरी संग्रहित करून सर्वांनी पाणावलेल्या डोळ्यांनी व पुन्हा भेटण्याचे वचन देऊन व कायम संपर्कात राहण्याचे आश्वासन देऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.




