*नांदाफाटा येथील रेशन दुकानातील काळाबाजारीला आळा कधी लावणार*
आधार बेस ओटीपी घेत धान्यापासून ठेवले वंचित
नांदाफाटा येथील रेशन दुकानात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारीनंतर पुरवठा निरीक्षण अधिकारी विक्की देवघरे यांनी केलेल्या चौकशीनंतर जुन 2025 मध्ये रेशन दुकान मनोज कुसराम यांचे कडून तात्पुरते काढून टाकण्यात आले होते व कारवाई करिता प्रकरण जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कडे पाठवण्यात आले जवळपास 140 क्विंटल धान्याची अफरातफर केल्याची बाब अहवालात नमूद आहे जवळपास चार लाख रुपये रक्कम रास्त भाव दुकानदाराकडून वसूल करण्याऐवजी राजकीय दबावापोटी जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांनी फक्त 1000/- रुपये जमानत जप्त करीत परत चौकशीचे आदेश दिले. तीन महिन्यापूर्वी रास्तभाव दुकान मनोज कुसराम यांना देण्यात आले आहे. नव्याने अन्न सुरक्षा योजनेत घेतलेल्या कार्डधारकांकडून धान्य उचल करण्याकरिता ओटीपी घेऊन त्यांना धान्य देत नसल्याची धक्कादायक माहिती समोर असून त्यांच्या धन्यवाद रास्त भाव दुकानदार डल्लामारत असल्याने या काळाबाजारीला कोण अंकुश लावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकशी समिती कागदावरच
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मनोज कुसराम याला दुकान जोडून पहिल्या महिन्याचे (डिसेंबर) धान्यवाटप होताच तात्काळ संपूर्ण कार्डधारकांचे बयान नोंदवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने तहसीलदार कोरपना यांनी चौकशी समिती नेमली मात्र तीन महिने लोटूनही कुठलीही चौकशी न झाल्याने समिती फक्त कागदावरच आहेत काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
दुसराच अन्य चालवितो रेशन दुकान
नांदाफाटा येथील रेशन दुकान मनोज कुसराम याचे नावाने आहे. तो अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये ठेकेदारीत काम करतो त्याचे ठिकाणी त्याचा भाऊ शैलेंद्र कुसराम हा रेशन दुकान चालवीत आहे. महिन्यातून फक्त 04 दिवस धान्य वाटप केले जाते यामुळे कार्डधारकांची मोठी फजिती होत असून कार्डधारकांना दिवसभर तासन तास धान्य घेण्याकरिता उभे राहावे लागते याबाबत पुरवठा विभागाकडे माहिती दिल्यावरही दुकान महिनाभर नियमित सुरू राहत नाही. नियमित धान्य वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून येथील दुकान महिला बचत गटाला देण्याची मागणी होत आहे.
आधारबेस ओटीपी घेत धान्य दिले नाही
माझे राशन कार्ड सुरू झाल्याची माहिती मला मिळाली माझ्याकडून 31 जानेवारीला रोजी दुकानदाराने ओटीपी घेतला परत 20 फेब्रुवारी रोजी ओटीपी घेतला. शासनाचे aepds या संकेतस्थळावर माझ्या नावाचे धान्य उचल केल्याचे दर्शेविते परंतु मला रास्तभाव दुकानदार शैलेंद्र कुसराम याचे कडे मागणी केल्यावरही त्याने धान्य दिले नाही व पुढील महिन्यात मिळेल अशी बतावणी करून मला वापस पाठविले.
रजिया मैताब शेख
कार्डधारक
दोन महिन्यापूर्वीच माझे रेशन कार्ड अन्नसुरक्षा योजनेत घेतल्याने मला धान्य मिळणे अपेक्षित होते 22 फेब्रुवारी रोजी धान्य उचलण्यासाठी गेले असता दुकानदाराने आधारबेस ओटीपी घेतला परंतु धान्य दिले नाही यापूर्वी जानेवारी महिन्यातही ओटीपी घेतला पण धान्य दिले नाही
वनमाला चांदेकर
कार्डधारक




