Home चंद्रपूर पी एम श्री अंतर्गत जी.प. उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे व्याख्यानाचा कार्यक्रम

पी एम श्री अंतर्गत जी.प. उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे व्याख्यानाचा कार्यक्रम

11

पी एम श्री अंतर्गत जी.प. उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे व्याख्यानाचा कार्यक्रम

..वरोरा
जी.प.उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शनासह विविध विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन 18 फरवरी 2026 ला करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मानव आयोग नवी दिल्ली अध्यक्ष डॉ.अंकुश आगलावे हे होते तर प्रमुख मार्गदर्शिका सहा.पोलीस निरीक्षक मायाताई चाटसे ,महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहा.पोलीस निरीक्षक सुधीर पाटील,कार्यक्रमाचे उद्घाटक गु. से.मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी प्रा.रुपलाल कावळे हे होते.तर प्रमुख उपस्थितीमध्ये आ. मा.वी. च्या मुख्याध्यापिका विद्याताई गोखरे , जी.प. शाळेचे मुख्याध्यापक नगाजी साळवे ,सहा.शिक्षक प्रदीप कोहपरे ,वाहतूक नियंत्रण विभागाचे धनपाल मेश्राम,संतोष निखाडे,विद्याताई मांढरे या मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अंकुश आगलावे यांनी बोलताना आपल्या भाषणात म्हणाले समाजात विकृत मानसिकता आहे ,आपण चुकीचे कृत्य केले तर त्याला आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशन निर्माण झाले.शिका,संघटित व्हा,संघर्ष करा,शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे.परंतु जी.प.शाळा बंद होण्याचे मार्गावर आहे.जोपर्यंत प्रशासनाचे,अधिकाऱ्यांचे , आमदार,खासदारांची मुले जी.प.शाळेत बसणार नाही तोपर्यंत शिक्षणाचे धोरण बदलणार नाही.सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपण मागे पडत आहों.काही विद्यार्थी विना कोचिंग ने कलेक्टर झाले आहे.कोचिंग मध्ये भरमसाठ पैशाची लूट होत असतात.शेतकऱ्यांची मुले मोठ्या फी मुळे कोचिंग लावू शकत नाही ही शोकांतिका आहे.आजचा विद्यार्थी मोबाईल वापरतो.परंतु अमेरिका,ऑस्ट्रेलिया,आफ्रिका येथे 14 ते16 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे.आपल्याकडे मोबाईल वापरण्यामुळे दुष्परिणाम दिसू लागले आहे.तुम्ही देशाचे भविष्य आहे विकसित भारत करून २०४७ पर्यंत देशाला विश्वगुरू बनवायचे आहे तर तुम्ही घडले पाहिजे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.पुढे त्यांनी पंतप्रधान,मुख्यमंत्री,ग्रामगीता कोणी लिहिली,संविधानाचे जनक कोण?असे प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिली.
सहा.पोलीस निरीक्षक मायाताई चाटसे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले की दुचाकी स्वारानी हेल्मेट व चारचाकी स्वा सिटबेल्ट लावणे आवश्यक आहे.वाहनचालकांनी नियमाचे पालन केले पाहिजे.हेल्मेट नसल्यामुळे २०२५ मध्ये अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे ३१००० हजार लोकांचे बळी गेले.माणूस आपल्या स्वतःच्या चुकितून घडते.चुकी सुधारावी लागते.रस्ता सुरक्षा विषयी व किशोरवयीन मुलींना सुद्धा मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.रूपलाल कावळे म्हणाले माणुसकीचे धडे शाळेत शिकायला शाळेत आलो.आपणही वैज्ञानिक ,संत, महासंत व्हावे.शाळेत आपल्याला शिस्त असली पाहिजे.शैक्षणिक मूल्य जपणे आवश्यक आहे .नेहमी सत्य बोलले पाहिजे सत्य चिरकाल टिकते.आदर,प्रामाणिकपणा, जबाबदारी,सहानुभूती, दुसऱ्याबद्दल कृतज्ञता अशी मूल्य जपली पाहिजे.असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नगाजी साळवे यांनी केले.संचालन व आभारप्रदर्शन शिक्षक विजय बांदुरकर यांनी केले.