Home Breaking News लाचखोर अभियंता लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

लाचखोर अभियंता लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

10

लाचखोर अभियंता लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पंधरा दिवसांत सावनेर नगर परिषदेत दुसरी कारवाई

सावनेर : सावनेर नगरपालिकेचे प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता नितीन मदनकर रा. नागपुर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने नगर परिषद कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळलेल्या माहितीनुसार, अभियंता नितीन मदनकर याने प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या मंजुरीसाठी  फिर्याद छिंदवाडा रोड, सावनेर यांच्याकडे चाळीस हजार रुपयांची लाच मागितली.त्यातील दहा हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला असुन उर्वरित तीस हजार रुपये 23 मार्च 2023 रोजी द्यायचे निश्चित झाले.
सदर बाब ही फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरला कळवली, त्याअंतर्गत छिंदवाडा रोड शिवाजी चौकात पैसे देण्यासाठी बोलावण्यात आले, तिथे अभियंता नितीन मदनकर व त्याचा साथीदार विकास राऊत याने तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताच दाभा धरुण बसलेल्या लाच लुचपत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले.
काही दिवसांपूर्वी सावनेर नगरपरिषदेत अशाच प्रकारची कारवाई झाली असल्याने नगरपरिषदेत एकच खळबळ उडाली होती.सदर घटनेपासून धडा घेण्याऐवजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अभियंत्यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांकडून लाच मागितली.त्या परिणामाचा आज सामना करावा लागला. आज घडलेल्या या दुसर्‍या घटनेपासून एकीकडे नगरपरिषद कार्यालयात पुढची विकेट कोणाची पडणार याची चर्चा रंगत आहे.तर दुसरीकडे भ्रष्ट अभियंत्याला अटक झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.