कांद्री येथे राजस्व व विद्यार्थी समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन
नागरिकांना यासारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

कन्हान,ता.23 सप्टेंबर
जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे शुक्रवारी (ता.२३) सकाळी दहा ते पाच वाजता पर्यंत विद्यार्थी समाधान व राजस्व शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पंचायत समिती सभापती सौ.मिना कावळे, सरपंच बलवंत पडोळे, जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, उपसभापती चेतन देशमुख, उपसरपंच श्यामकुमार बर्वे उपस्थित होते.





