संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथि साजरी

कन्हान,ता.२२ डिसेंबर.
कांद्री येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नवनियुक्त तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष मा.योगेश वाडीभस्मे यांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी कांद्री ग्रामपंचायत माजी सरपंच बलवंत पडोळे, माजी सदस्य शिवाजी चकोले, जेष्ठ नागरिक कवडुजी आकरे, हेमराजजी आंबाळकर आदि ने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत पुण्यतिथि साजरी करण्यात आली.





