रायनगर हनुमान मंदीरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
कन्हान,ता.२२ जानेवारी
कन्हान येथील राय नगर, हनुमान मंदिर कमेटी च्या वतीने (दि.२०) जानेवारी रोजी मंदिराचे स्वच्छ्ता अभियान अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शैलेश शेळके, निलकंठ मस्के,पवन माने व संपूर्ण कमेटी द्वारे राबविण्यात आले. मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली.

रविवार (दि.२१) जानेवारी रोजी गणेश मंदिर कन्हान च्या वतीने काढण्यात आलेल्या कलश मिरवणुकीचे पुष्प वर्षाव, शाल श्रीफळ व प्रसाद वितरण करुन स्वागत करण्यात आले. यावेळी बजरंग दल नागपुरच्या वतीने काढण्यात आलेल्या राम रैली चे सुध्दा पुष्प वर्षाव, शाल श्रीफळ व प्रसाद वितरण करुन स्वागत करण्यात आले.

सायंकाळी ५ वाजता मा.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे कन्हान भाजप च्या वतीने व रायनगर, स्थित हनुमान मंदिर येथे दर्शन घेतले प्रसंगी कमेटी च्या वतीने स्वागत करण्यात आले.

(दि.२२) जानेवारी रोजी सकाळी हनुमान मंदिरात भजन कीर्तन, आरती व ३१ किलो बूंदीचा प्रसाद संपूर्ण परिसरात घरोघरी वाटप करण्यात आला. सायंकाळी महाआरती करुन महाप्रसादाचे नागरिकांना वितरण करण्यात आले. दोन दिवसीय महोत्सवात परिसरातील अनेक नागरिक व मूल,मूली, स्त्रियांनी उत्सपुर्तपणे सहभाग घेतला. या महोत्सव प्रामुख्याने जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे,तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्में, विस्तारक मनोज चवरे, भाजाप नेते गजानन आसोले, तालुका उपाध्यक्ष शैलेश शेळके, सौ.मिना कंलबे,भाजपा कन्हान चे अध्यक्ष विनोद किरपाण, कांद्री शहर अध्यक्ष गुरुदेव चकोले, तालुका ओबीसी अध्यक्ष उमेश कुंभलकर, कन्हान महामंत्री नीलकंठ मस्के, महामंत्री महेंद् साबरे, मयूर माटे उपस्थित होते.





