गुप्ता कोल वॉशरीच्या अन्यायाने स्थानिक शेतकरी, युवा त्रस्त, प्रदुरषणाने आरोग्य धोक्यात
घाटरोहना ग्रा.प.चे गुप्ता कोल वॉसरीला निवेदन, मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
कन्हान,ता.२४
गट ग्राम पंचायत घाटरोहना एसंबा क्षेत्रात गुप्ता कोल वॉशरी (महामीनरल) च्या कोळसा व केमिकल युक्त दुषित पाणी व धुळीच्या प्रदुषनामुळे परिसरातील शेतकरी, मजुर, युवा रोजगार त्रस्त असुन शेतक-यांचे शेत पिकाचे व शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.

प्रदुषणामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणामाने नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी ग्राम पंचायती ला प्राप्त झाले. ग्रा.प.व्दारे कंपनी प्रशासनाला पत्र देऊन सुध्दा दखल न घेतल्याने कपंनीने व्यवस्थित कंपनी चालवुन मागणी पुर्ण न केल्यास कंपनी गेट पुढे स्थानिक नागरिकांचे अर्ध नग्न आंदोलन करण्याचा इशारा सरपंच किशोर बेहुणे यांनी दिला आहे.





