Home चंद्रपूर सामाजिक कार्यकर्ता आमिष मेश्राम यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा

सामाजिक कार्यकर्ता आमिष मेश्राम यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा

22

सामाजिक कार्यकर्ता आमिष मेश्राम यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा

बल्लारपूर : सामाजिक कार्यकर्ता आमिष मेश्राम यांचा वाढदिवस नुकताच खास सोहळ्याने साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन दहेली (लावारी) मध्ये शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.

मेश्राम यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेतच अतिथी म्हणून उपस्थित राहून मुलांसाठी आवश्यक साहित्य वाटप करण्याची संधी मिळवली. या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक, विद्यार्थ्यांसह मेश्राम यांचे सर्व मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण झाला आणि समाजकार्याचे महत्त्व जाणवले, अशी शाळेच्या शिक्षकांची प्रतिक्रिया होती.