Home Sports *डब्ल्यूएसएफ च्या शाश्वत ची भारतीय हॉलीबॉल संघाच्या शिबिरा करिता निवड..*

*डब्ल्यूएसएफ च्या शाश्वत ची भारतीय हॉलीबॉल संघाच्या शिबिरा करिता निवड..*

16

*डब्ल्यूएसएफ च्या शाश्वत ची भारतीय हॉलीबॉल संघाच्या शिबिरा करिता निवड..*
वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन व लोकशिक्षण संस्था वरोराचा खेळाडू शाश्वत शंकर धारणकर याची अहमदाबाद येथे होणाऱ्या एशियन व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप करिता भारतीय संघामध्ये संभावित भारतीय संभावित संघामध्ये सराव शिबिरा करिता निवड झाली आहे. सराव शिबिर अहमदाबाद येथे दिनांक 25 मार्चपासून सुरू होत आहे .भारतीय संघाच्या सराव शिबिरामध्ये निवड होणारा शाश्वत हा चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला. शाश्वत हा सध्या एसआरएम विद्यापीठ चेन्नई येथे शिक्षण घेत आहे.शाश्वतच्या यशाबद्दल वरोरा शहरात सर्वत्र कौतुक होत असून त्याचे यशाबद्दल लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री श्रीकांत पाटील सर ,वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री गजानन जीव तोडे, आश्रयदाते मानस धानोरकर, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील ,सचिव विरल शहा यांनी अभिनंदन केले शाश्वत यांनी आपल्या यशाचे श्रेय वरिष्ठ मार्गदर्शक श्री सुनील बांगडे, निखिल बोबडे ,देवानंद डुकरे, संजय अंबुलकर, गणेश मुसळे, दुष्यंत लांडगे व वरोरा स्पोर्टस फाउंडेशन व लोक शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी यांना दिले