Home चंद्रपूर महाकाली यात्रा व रामनवमी पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक रूट मार्च; चंद्रपुरात सुरक्षा यंत्रणा...

महाकाली यात्रा व रामनवमी पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक रूट मार्च; चंद्रपुरात सुरक्षा यंत्रणा सतर्क

27

महाकाली यात्रा व रामनवमी पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक रूट मार्च; चंद्रपुरात सुरक्षा यंत्रणा सतर्क

चंद्रपूर, दि. २५ मार्च २०२६ (प्रतिनिधी) – आगामी महाकाली यात्रा तसेच श्रीरामनवमी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर शहर पोलिसांकडून बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजता व्यापक रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च पोलीस अधीक्षक मा. श्री. मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
गौतम नगर येथील माता महाकाली यात्रा नगरी येथून सुरू झालेला हा रूट मार्च अंचलेश्वर गेट, गिरनार चौक, गांधी चौक, जयंत टाकीज चौक, मौलाना आझाद चौक, छोटी मस्जिद, पुन्हा गिरनार चौक मार्गे शिवाजी चौकपर्यंत काढण्यात आला. प्रमुख मिरवणूक मार्गावर पोलिसांची प्रभावी उपस्थिती ठेवण्यात आली.
या वेळी मनपा आयुक्त मा. अनुकुरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक मा. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रमोद चौगुले, मनपा उपायुक्त मा. संदीप चीद्रवार यांची उपस्थिती होती.
यात्रा बंदोबस्तासाठी ३ पोलीस निरीक्षक, २२ पोलीस अधिकारी, १५० पोलीस कर्मचारी तसेच २०० पुरुष व महिला गृहरक्षक दलाचे जवान अशा एकूण सुमारे ३०० ते ३२५ जणांचा सहभाग होता.
सण-उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.