Home Breaking News रॉका कन्हान शहर अध्यक्षपदी अशोक पाटील तर महासचिव पदी नरेश सोनेकर यांची...

रॉका कन्हान शहर अध्यक्षपदी अशोक पाटील तर महासचिव पदी नरेश सोनेकर यांची नियुक्ती

7

रॉका कन्हान शहर अध्यक्षपदी अशोक पाटील तर महासचिव पदी नरेश सोनेकर यांची नियुक्ती


कन्हान 25 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराजबाबा गुजर यांच्या मार्गदर्शनात पारशीवणी रॉका तालुका अध्यक्ष सचिन आमले यांनी रॉका कन्हान शहर अध्यक्षपदी अशोक पाटील तर महासचिव पदी नरेश सोनेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्ती केल्याबद्दल रॉका सुप्रीमो शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, रॉकाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग, जी.प.सदस्य सलील देशमुख, जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर, विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, कार्याध्यक्ष पारशीवणी तालुका पुरण तांडेकर इत्यादी मान्यवरांचे आभार मानले.


कन्हान शहर अध्यक्षपदी व महासचिव पदी निवड झाल्याबद्दल अर्जुन बेलेकर, देवेंद्र पात्रे, रवी खडसे,अमित नगरारे, पप्पू नितनवरे, राजन टाकसांगे, सचिन कापगते आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी अशोक पाटील व नरेश सोनेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.