Home चंद्रपूर *चंद्रपूरच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी टायगर सफारी प्रकल्पाला गती द्या – आ....

*चंद्रपूरच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी टायगर सफारी प्रकल्पाला गती द्या – आ. किशोर जोरगेवार* *आ. जोरगेवार यांचा अधिवेशनात ठाम पाठपुरावा; केंद्राकडून लवकरच मान्यतेचे संकेत – वनमंत्री गणेश नाईक*

13

*चंद्रपूरच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी टायगर सफारी प्रकल्पाला गती द्या – आ. किशोर जोरगेवार*

*आ. जोरगेवार यांचा अधिवेशनात ठाम पाठपुरावा; केंद्राकडून लवकरच मान्यतेचे संकेत – वनमंत्री गणेश नाईक*

चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमीजवळील ५०० एकर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला गती देण्याची मागणी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देताना केंद्राकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच या प्रकल्पाला मान्यता मिळणार असल्याचे उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहाला दिले.
चंद्रपूर टायगर सफारी आणि रेस्क्यू सेंटरसाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा विषय मांडला होता. वनमंत्री नाईक यांनीही प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत निधी वितरण प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आमदार जोरगेवार यांनी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची पाहणी करून प्रकल्पाच्या आराखड्याची माहिती घेतली होती.
दिल्ली येथील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या कार्यालयातही या संदर्भात बैठक पार पडली होती. या बैठकीला भारत सरकारचे सदस्य सचिव डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, महाराष्ट्र राज्य वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, तसेच एफडीसीएम गोरेवाडा प्राणी संग्रहालय लिमिटेड, नागपूरचे सीईओ चंद्रशेखर बाला उपस्थित होते.
चंद्रपूरच्या वन अकादमीजवळ उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड या संस्थेकडे प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साऊथ अमेरिकन, साऊथ आफ्रिकन आणि इंडियन ट्रेल अशा विविध थीमवर आधारित प्राणीदर्शन झोन असतील. पर्यटकांना येथे कांगारू, जग्वार, माकडे, कॅपीबारा, विविध रंगीबेरंगी पक्षी तसेच देशी-विदेशी प्राणी पाहता येणार आहेत. याशिवाय ४४ हेक्टर क्षेत्रात वाहन सफारी, २० एकर क्षेत्रात चिल्ड्रन पार्क आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा निर%